रंगभूमी, एकपात्री अभिनय, गणेशोत्सव देखावे, जाहिरात व सामाजिक उपक्रमांतील ३ दशकांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल मिळालेले मानाचे पुरस्कार.
पुणे नाट्य परिषदेतर्फे बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे ३ दशकांच्या प्रदीर्घ नाट्य व एकपात्री सेवेबद्दल प्रदान.
विश्वास पटवर्धन यांच्या "संस्कार आईचे" संस्थेतर्फे एकपात्री अभिनय क्षेत्रातील निरंतर योगदानासाठी प्रदान.
बालगंधर्व परिवारतर्फे एकपात्री अभिनय क्षेत्रातील तरुण कलाकाराला दिला जाणारा मानाचा गौरव.
महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते गणेशोत्सव रेकॉर्डिंगमधील २१ वर्षे पूर्ण केल्याबद्दल विशेष सत्कार व गौरव.
पुण्यातील एकपात्री कलाकारांच्या परिषदेचे माजी अध्यक्ष आणि ९ वर्षे विश्वस्त म्हणून प्रदीर्घ सेवा.
ABP माझा आयोजित "महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट देखावा" या मानाच्या स्पर्धेत विशेष पुरस्कार व गौरव.
गणेशोत्सव ऑडिओ देखावे आणि इतिहासप्रबोधनात्मक कार्याबद्दल महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे व गरूड गणपती मंडळाच्या हस्ते विशेष सत्कार व गौरव.
मराठी रंगभूमी आणि एकपात्री अभिनय कौशल्याबद्दल नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्याकडून कलाकृतीची विशेष प्रशंसा व कौतुक.
जिवंत देखाव्यांच्या क्षेत्रात राहुल भालेराव यांनी केलेले काम अचाट आहे. प्रत्येक वेळी नवीन कल्पना, वैचारिक आशय, प्रभावी मांडणी करणारे लेखन व दिग्दर्शन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत आयोजित ११ प्रमुख राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाचे विजेतेपद.
— राहुल विनायक भालेराव